Government Decision Heatwave : उन्हाचा पारा चाळीशीपार! सरकारचा मोठा निर्णय; दुपारी काम बंद ठेवण्याचे आदेश, तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?

Rashmi Mane

राज्यात उष्णतेचा कहर!

महाराष्ट्रात तापमान झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी 47 ते 49°C पर्यंत पारा पोहोचल्याने नागरिकांसाठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे.

‘हीट ॲक्शन प्लॅन’ लागू

उष्णतेच्या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याने ‘हीट ॲक्शन प्लॅन’ जाहीर केला आहे. नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दुपारी कामाला ब्रेक

आता दुपारी 12 ते 4 या वेळेत कामगारांना सक्तीची विश्रांती दिली जाणार आहे. कडक उन्हात काम केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

कामाच्या वेळेत बदल

कामाची वेळ सकाळी 6 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 8 अशी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उष्णतेपासून बचावासाठी हा मोठा निर्णय आहे.

‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट

हवामान खात्याने ‘रेड’ किंवा ‘ऑरेंज’ अलर्ट दिल्यास दुपारच्या वेळेत सर्व काम पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.

15 जिल्हे हाय रिस्कमध्ये

विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील 15 जिल्हे उच्च जोखमीमध्ये आहेत. नागपूर, चंद्रपूर, जळगाव, नंदुरबार यांसारख्या भागांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

कोणत्या कामगारांना फायदा?

बांधकाम मजूर, रिक्षाचालक, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी बॉय, वाहतूक पोलीस आणि आशा व अंगणवाडी सेविकांना या नियमांचा थेट फायदा होणार आहे.

आरोग्य आणि सुविधा

सरकारकडून ORS, औषधे, 108 रुग्णवाहिका, तसेच ‘कूलिंग सेंटर’ आणि पाणी बूथची व्यवस्था केली जात आहे. नागरिकांना सावली आणि थंडावा मिळावा यावर भर आहे.

तुमचा जिल्हा सुरक्षित आहे का?

विदर्भ: नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा.

मराठवाडा: लातूर, नांदेड.

खानदेश/उत्तर महाराष्ट्र: जळगाव, नंदुरबार, धुळे.