Ganesh Sonawane
दुचाकी घेताना आता दोन हेल्मेट देणे अनिवार्य होणार आहे. वाहन उत्पादक कंपन्यांना हे बंधनकारक करण्यात येणार आहे.
दोन हेल्मेट मिळाल्यावर दोघांनाही हेल्मेट घालणे सक्तीचे होईल. यामुळे अपघातातील जिवीत हानी कमी होईल, असा सरकारचा विश्वास.
नवीन नियमांसाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात बदल प्रस्तावित. अंतिम अधिसूचना आल्यानंतर तीन महिन्यात नियम लागू होतील.
1 जानेवारी 2026 पासून 50cc पेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकींना Anti-Lock Braking System (ABS) बसवणे बंधनकारक होईल.
ABS सिस्टममुळे अपघात टळतील आणि सुरक्षितता वाढेल. यामुळे डोक्याला होणारे गंभीर इजा टाळल्या जातील.
या नियमांवर 30 दिवसांत हरकती/सूचना देता येणार. comments-morth@gov.in या ईमेलवर मत नोंदवा.
भारतामध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण मोठे आहे. हेल्मेट आणि ABS यामुळे ही संख्या घटण्याची अपेक्षा.
नवीन नियमांचा हेतू नागरिकांचे प्राण वाचवणे हाच आहे. दुचाकी वापरकर्त्यांसाठी ही काळजीपूर्वक पावले उचलली जात आहेत.