सरकारनामा ब्युरो
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज्यांच्या विषयी प्रत्येकाचे वेगळे विचार आहेत.
आपल्या थोड्याश्या कारकीर्दीतही त्यांनी खूप उल्लेखनीय कामगिरी केली. याच कारकीर्दीमध्ये महाराजांच्या राजकीय योग्यतेविषयी इतिहासकार काय म्हणायचे ते आपण पाहणार आहोत.
इतिहासकार म. म. पोतदार म्हणतात, छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले त्यावेळी राज्याची यंत्रणा दुहीमुळे ढिलावले होती. अशी ढिलावलेली यंत्रणा घेऊन त्यांनी औरंगजेबाशी टक्कर दिली. याबद्दल त्यांची तारीफच...
शिवाजी महाराजांनी घालून दिलेले दंडक आणि तयार केलेली राजनीती त्यांनी चालूच ठेवली होती. संभाजी महाराज म्हणतात, “आबासाहेबांचे संकल्पित आहे ते आम्हास चालवणे अगत्य"
इंग्रजांसोबत झालेल्या एका मैत्री करारात महाराज म्हणतात, "माझ्या वडिलांचा वेळी जो शिरस्ता होता तोच मी पाळीन" गादीवर आल्यानंतर राज्ययंत्रणेवर आपली जरब बसविली. त्यामुळे वतनदार लोक दचकून वागू लागले.
राज्यकारभाराचे आणि न्याय निवाड्याचे महाराजांचे हजारो कागद उपलब्ध आहेत. त्यावरून दिसते की, ते निष्पक्षपाती न्याय देत होते. मनुष्याची कदर आणि औदार्य हे त्यांचे गुण पुष्कळ ठिकाणी दिसून आलेले आहेत.
धर्माच्या क्षेत्रांत, साधुसंत, देवदेवता, विद्वान ब्राह्मण यांच्याविषयी महाराजांनी वडिलांप्रमाणेच आदरभाव ठेवलेला आढळतो.
बाटून मुसलमान झालेल्या अनेक ब्राह्मणांना शुद्ध करून पुन्हा हिंदूधर्मात घेण्याचे धाडस संभाजी महाराजांनी दाखविलेले दिसते.