Rashmi Mane
महाराष्ट्रातल्या राजकीय घटनांचा साक्षी असलेला 'वर्षा' बंगला लोकप्रिय आणि नेहमीच चर्चेचा विषय असतो.
खर तर हा बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हता आणि त्याचे नावही 'वर्षा' नव्हते.
नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत हा बंगला कधीच मुख्यमंत्र्यांचा नव्हता आणि ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत त्याचे नावही वर्षा नव्हतं.
नाईक कृषिमंत्री झाले आणि त्यांच्या वाट्याला मंत्री म्हणून 'डग बीगन' नावाचा इंग्रजी आमदानीतला बंगला आला.
नाईक यांचा मुलगा अविनाशच्या वाढदिवशी 7 नोव्हेंबर 1956 ला नाईक कुटुंब 'डग बीगन'वर राहायला आले.
नाईक यांचा पाऊस हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. कवी पांडुरंग श्रावण गोरे यांची ‘शेतकऱ्यांचे गाणे’ ही अत्यंत आवडीची कविता होती. त्यामुळे आल्या दिवशीच नाईक यांनी 'डग बीगन'चं नामांतर 'वर्षा' असं केलं.
मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली. 5 डिसेंबर 1963 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि हा बंगल्याला मुख्यमंत्र्याचे निवासस्थान म्हणून नावलौकिक मिळाले.