Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात विरोधकांनी अर्थात इंडिया या आघाडीनं अविश्वास प्रस्ताव आणला आहे. भारतीय संसदेच्या इतिहासात आतापर्यंत 27 वेळा अविश्वास प्रस्ताव सादर झाला आहे. पण या अविश्वास प्रस्तावामुळं आतापर्यंत कोणाचं सरकार पडलं आणि तरलं होतं याचा हा आढावा..
देशाच्या संसदीय इतिहासातील पहिला अविश्वास ठराव 1963 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारविरोधात प्रजा सोशलिस्ट पार्टीच्या जे.बी. कृपलाणी यांनी आणला होता.
लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना तीन वर्षांच्या कार्यकाळात तीन वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला.
मोरारजींच्या कार्यकाळात दोन वेळा अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले.
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या पहिल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात दोन वेळा आणि त्यानंतर 13 वेळा अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला. भारतीय संसदीय इतिहासात सर्वाधिक म्हणजे 15 वेळा अविश्वास ठराव इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आले आणि दरवेळी इंदिरा गांधी यशस्वी ठरल्या.
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारला तीन वेळा अविश्वास ठरावाच्या अग्निपरीक्षेला तोंड द्यावे लागले. पहिल्यांदा 1996 ,1999 आणि 2003 मध्ये तिसऱ्यांदा वाजपेयी अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले.
नरसिंहराव पंतप्रधान असतानाही तीन वेळा अविश्वास प्रस्ताव सादर झाला.
2008 मध्ये पंतप्रधानपदी मनमोहन सिंह असताना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला. त्यांच्या सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या अणुकरारामुळे हा प्रस्ताव आणला गेला होता. मात्र, मनमोहन सिंह यांच्या फ्लोअर मॅनेजरनी सरकार वाचवण्यात यश मिळवले.
1997 मध्ये अनपेक्षितरीत्या सत्तेवर आलेले एच.डी.देवेगौडा यांच्या सरकारचा पाठिंबा काँग्रेसने काढून घेतल्याने ते सरकार पडले.
2018 आणि 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोन वेळा अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले.