Jagdish Patil
हाँगकाँगमधील ताईपो भागातील एका मोठ्या निवासी संकुलात भीषण आग लागली आहे.
या आगीनं आता रौद्र रुप धारण केलं असून आतापर्यंत या आगीत 44 जणांचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या इमारतींमध्ये 279 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
या आगीमुळे हाँगकाँगमधील हजारो लोकांवर मोठं संकट ओढावलं आहे.
या आगीचे अंगावर काटा आणणारे भयानक फोटो समोर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये आभाळाला भिडणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत आहेत.
तसंच ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे जवान आणि घाबरलेले लोक दिसतायत.
मिळालेल्या माहितीनुसार, हाँगकाँगमधील 'वांग फुक कोर्ट' नावाच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागली.
या कॉम्प्लेक्समध्ये 8 ब्लॉक्स असून एकूण 2 हजार फ्लॅट्स आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 700 जवानांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र इमारतीत नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि या बोर्डांमुळे आग पसरल्याचा संशय पोलिसांना आहे.
हाँगकाँग अग्निशमन विभागाने या आगीला पाचव्या स्तराचा अलार्म दिला आहे. हा सर्वात गंभीर स्तर मानला जातो.