Ravikant Tupkar Political Journey : राजकीय वारसा नसतांना रविकांत तुपकरांचं नेतृत्व कसं उभ राहिलं ?

सरकारनामा ब्यूरो

रविकांत तुपकर

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे विचार करून, आंदोलनाच्या माध्यमातून सरकार व प्रशासनाला हादरवणारे नेतृत्व म्हणून रविकांत तुपकरांचे नाव घेतले जाते.

Ravikant Tupkar | Sarkarnama

अष्टपैलू व्यक्तिमत्व

राजकारण, समाजकारण, साहित्य- सांस्कृतीक क्षेत्रात भरीव कार्य करणारे रविकांत तुपकरांना अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणुन ओळखले जाते.

Ravikant Tupkar | Sarkarnama

राजकीय वारसा नसतांनाही

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, राजकारणाची पार्श्वभूमी नसतांना तुपकरांनी राजकारणात आपला ठसा उमटवला आहे.

Ravikant Tupkar | Sarkarnama

विदर्भातील नेते

बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरकाठावर वसलेल्या सावळा गावात १३ मे १९८५ला तुपकर यांचा जन्म झाला.

Ravikant Tupkar | Sarkarnama

शिक्षण

कला शाखेतून त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. वडिलांचा शेती हा परंपरागत व्यवसाय, त्याला दुग्धव्यवसायाची जोड होती.

Ravikant Tupkar | Sarkarnama

चळवळीच सहभाग

विद्यार्थीदशेतच शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते शेतकरी चळवळीत सहभागी झाले.

Ravikant Tupkar | Sarkarnama

‘रविकांत तुपकर आणि आंदोलन’

‘रविकांत तुपकर आणि आंदोलन’ हे समीकरण अविरतपणे सुरु आहे. शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न, असो की खते आणि बियाण्यांचा प्रश्न, पीककर्ज अशा विषयांवर त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत.

Ravikant Tupkar | Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्रतही नावलौकिक

काही काळानंतर तुपकरांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली व पश्चिम महाराष्ट्रातही त्यांचा नावलौकिक निर्माण झाला.

Ravikant Tupkar | Sarkarnama

Next : पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतात हे 'पाच' पदार्थ !

येथे क्लिक करा