Amit Ujagare
ऑपरेशन सिंदूर हा भाजप सरकारनं केलेला तमाशा होता, असं वादग्रस्त विधान प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत चर्चेदरम्यान बोलताना केलं.
१४ जुलै २०२५ रोजी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी हे मान्य केलं होतं की, पहलगामचा दहशतवादी हल्ला हा निःसंशयपणे सुरक्षेतील चूक होती. त्यामुळं गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यायला हवी, नायब राज्यपालांनी नाही.
तुम्ही काश्मीरमध्ये जनतेला पर्यटनासाठी बोलवता मग त्यांना सुरक्षेची हमी देणं हे तुमचं प्राथमिक कर्तव्य नाही का? पहलगामच्या घटनेमागे पाकिस्तानचा हात असला तरी त्या २६ पर्यटकांच्या जीवाची किंमत त्यांना कोण दिली?
एकीकडं सरकार म्हणतंय की जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वकाही नॉर्मल आहे. याच हट्टापोटी पहलगामची घटना घडली कारण तिथं सुरक्षा रक्षक तैनात नव्हते. त्यामुळं या घटनेसाठी पूर्णपणे सरकारचं जबाबदार आहे.
पहलगाममध्ये पर्यटक सरकारच्या भरवशावर गेले आणि सरकारनं त्यांना देवाच्या भरवशावर सोडलं. या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती? पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्र्यांची नव्हती का?
इंदिरा गांधीपेक्षा ५० टक्के हिंमत असेल तर ट्रम्प यांना खोटं ठरवून दाखवा, असं आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं होतं.
पहलगाम हल्यातील तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत माहिती.
९ मे रात्री अमेरिकेचे उपराष्ट्रपती मला तासभर फोन करण्याचा प्रयत्न करत होते. पण मी सैन्य दलांसोबत मिटिंगमध्ये असल्यानं फोन उचलला नाही. नंतर फोनवरुन बोलणं झालं.