IFS Apala Mishra : डॉ. अपला मिश्रा आयएफएस कशी झाली, UPSC टॉपरची रंजक कहाणी

Rashmi Mane

जन्म

IFS अपला मिश्रा यांचा जन्म 1997 मध्ये गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथे झाला.

IFS Apala Mishra | Sarkarnama

अपला लष्करी कुटुंबातील

मिश्रा या लष्करी कुटुंबातील आहे. त्यांचे वडील अमिताभ मिश्रा कर्नल आहेत. त्याचा भाऊ अभिषेक मिश्रा देखील लष्करात मेजर आहे.

IFS Apala Mishra | Sarkarnama

शिक्षण

अपला मिश्रा यांनी देहराडून येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अपलाने आर्मी कॉलेजमधून डेंटिस्टची पदवी मिळवली आहे.

IFS Apala Mishra | Sarkarnama

समाजकार्य

अपला यांना समाजासाठी काम करायचे होते आणि म्हणूनच तिने नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.

IFS Apala Mishra | Sarkarnama

तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले

IFS अपला मिश्रा यांनी डेंटीस्टची प्रक्टिस सोडून UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. तिसऱ्या प्रयत्नात 9 वा क्रमांक मिळवून आयएफएस बनल्या.

IFS Apala Mishra | Sarkarnama

7 ते 8 तास अभ्यास केला

UPSC परीक्षेची तयारी करताना ती 7-8 तास अभ्यास करायची.

IFS Apala Mishra | Sarkarnama

गोष्टींचे विश्लेषण केले

पहिल्या दोन प्रयत्नांत झालेल्या चुकांचे विश्लेषण करून त्यांनी योग्य रणनीती आखली. त्यानंतर वेळेचे व्यवस्थापन आणि त्याच्या चुका सुधारून त्याने यूपीएससी टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले.

IFS Apala Mishra | Sarkarnama

मुलाखतीत विक्रम मोडला

2020 मध्ये, अपला मिश्रा यांनी 9 वा क्रमांक मिळवला. यानंतर त्याने मुलाखतीमध्ये सर्वाधिक गुण मिळवत आजवरच्या उमेदवारांचा विक्रम मोडला.

IFS Apala Mishra | Sarkarnama

मुलाखतीत विक्रम मोडला

अपलाला मुलाखतीच्या फेरीत 275 पैकी सर्वाधिक 215 गुण मिळाले होते.

IFS Apala Mishra | Sarkarnama

इंस्टाग्रामवर सक्रिय

IFS अपला मिश्रा सोशल मीडियावर सक्रिय आहे.

IFS Apala Mishra | Sarkarnama

सध्या अपला मिश्रा या..

अपला मिश्रा यांनी 1 ऑगस्ट 2022 पासून UN मध्ये स्थायी प्रतिनिधी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

Next : चिमुकल्याचं प्रेम बघा ! डोक्यावर कोरला एकनाथ शिंदेंचा चेहरा