APMC Election: कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कशी असते रे भाऊ...?

Deepak Kulkarni

निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

APMC Election | Sarkarnama

निवडणुका रखडल्या..

कोरोनामुळे राज्यात लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आणण्याऐवजी प्रशासक, प्रशासकीय मंडळ, पुन्हा प्रशासक आणून निवडणुका लांबविण्यात आल्या होत्या.

APMC Election | Sarkarnama

निवडणुकीचा कालावधी:

दर पाच वर्षांनी बाजार समितीमध्ये निवडणूका घेतल्या जातात.

APMC Election | Sarkarnama

निवड प्रक्रिया:

बाजार समितीचे सभापती, उपसभापती अशाची निवड याद्वारे केली जाते.

APMC Election | Sarkarnama

मतदान अधिकार

ग्रामपंचायतींचे सदस्य आणि सेवा सहकारी सोसायट्यांचे सदस्य हे मतदार होते. शेतकऱ्यांना थेट या निवडणुकीत मतदान करता येत नव्हते.

APMC Election | Sarkarnama

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय...

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकर्‍यांना बाजार समितीच्या मतदानासाठी पात्र ठरवण्यात आले.

APMC Election | Sarkarnama

आघाडी सरकारकडून कायदा रद्द

महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारचा कायदा रद्द करून परत शेतकर्‍यांना मतदानासाठी अपात्र ठरवले होते.

APMC Election | Sarkarnama

शिंदे-भाजप सरकारने पुन्हा अधिकार

काही दिवसांपूर्वी झालेल्या सतांत्तरानंतर शिंदे-भाजप सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला.

APMC Election | Sarkarnama

कारभार कसा चालतो?

बाजार समितीचा कारभार निवडून आलेले संचालक मंडळ, त्यांच्यामधील सभापती, उपसभापती, सदस्य व बाजार समितीचे सचिव अशा संचालक मंडळाकडून केला जातो.

APMC Election | Sarkarnama

निवड प्रक्रिया :

बाजार समितीच्या सध्याच्या निवडणूक पद्धतीत कार्यक्षेत्रातील सेवा संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्यांकडून ११ व ग्रामपंचायत सदस्यांकडून ४ असे १५ शेतकरी प्रतिनिधी निवडले जातात.

APMC Election | Sarkarnama

सदस्य संख्या

संचालक मंडळात १५ सदस्य असतील, त्यात दोन महिला, एक इतर मागासवर्गीय व्यक्ती, एक विमुक्त जातीतील आणि भटक्या जमातीतील व्यक्ती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील व्यक्तीला प्रतिनिधित्व करता येते. शिवाय व्यापारी २ व हमाल, मापाडी १ असे एकूण १८ प्रतिनिधी निवडून दिले जातात.

APMC Election | Sarkarnama

आचारसंहिता

सहकारी संस्थांप्रमाणेच राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना निवडणुकीसाठी आचारसंहिता आणि अन्य नियमावली लागू आहे.

APMC Election | Sarkarnama

Next : सुषमा स्वराज आणि बासुरी स्वराज यांच्यातील अनोखे नाते, पाहा खास फोटो!