कशी आहे संसदेची नवी इमारत ; पहिल्यांदाच समोर आले फोटो, जरुर पाहा !

सरकारनामा ब्यूरो

नवीन संसद भवनाची इमारत तयार झाली आहे. पहिल्यांदाच नवीन संसद भवनाचे फोटो समोर आले आहेत.

Sarkarnama

फोटोमध्ये नवीन लोकसभा भवन अतिशय भव्य आणि प्रशस्त दिसत आहे.

Sarkarnama

संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नवीन इमारतीत मांडले जाईल, अशी शक्यता आहे. नवीन इमारतीमध्ये अधिवेशन आयोजित करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे.

Sarkarnama

संसदेची नवीन इमारत जानेवारीच्या अखेरीस तयार होईल. संसदेतील आतील भाग पूर्ण करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Sarkarnama

नवीन संसद भवन 'सेंट्रल व्हिस्टा'च्या पुनर्विकासाचा एक महत्वाचा भाग आहे. अतिशय आकर्षक, भव्य आणि सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज नवीन संसद भवन असणार आहे.

Sarkarnama

नवीन संसद भवन परिसर एकूण 64 हजार 500 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेला आहे. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये 1 हजार 272 खासदार बसू शकतात,अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

Sarkarnama

डिसेंबर 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या नवीन संसद भवनाची पायाभरणी केली होती.

Sarkarnama

भारताचा लोकशाही वारसा दाखवण्यासाठी भव्य संविधान सभागृह, संसद सदस्यांसाठी विश्रामगृह, वाचनालय, वेगवेगळ्या समितींसाठी बैठक खोल्या, कॅन्टीन आणि पुरेशी पार्किंगची जागा या भवनात असणार आहे.