Ganesh Thombare
संग्राम जगताप यांचा आज (दि.12 जून) वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचा राजकारणातील प्रवास जाणून घेऊयात.
तरुण वयातच राजकारणात आलेले आमदार संग्राम जगताप यांचा यशाचा आलेख वाढताच राहिला.
नगरसेवक, दोनदा महापौर आणि आमदार असा संग्राम जगताप यांचा प्रवास आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आलं. मात्र, त्यांनी सुजय विखेंना चांगली टक्कर दिली होती.
आमदार संग्राम जगताप यांचे वडील अरुण जगताप हे विधान परिषदेचे आमदार होते.
वडील अरुण जगताप राजकारणात असल्याने संग्राम जगतापांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं.
संग्राम जगताप यांच्या पत्नी नगरसेविका आहेत तर बंधू सचिन जगताप हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.
आमदार संग्राम जगताप हे भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत.
नगर शहर विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 ला संग्राम जगताप हे दोनदा आमदार झाले.