Ganesh Thombare
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा आज (दि.13 जून) वाढदिवस. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात.
आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत.
आदित्य ठाकरे यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं.
आदित्य ठाकरे यांचे वडील उद्धव ठाकरे राजकारणात असल्यामुळे त्यांना घरातूनच राजकारणाचं 'बाळकडू' मिळालं.
2010 च्या दसरा मेळाव्यापासून युवा सेनेची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे.
2019 मध्ये आदित्य ठाकरेंनी वरळीतून विधानसभेची निवडणूक लढवत ते आमदार झाले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली.
आदित्य ठाकरे यांची 2019 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली.
युवा सेनेचे प्रमुख, आमदार, पर्यावरण मंत्री, मुंबई उपनगरचे पालकमंत्री, असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.