Amit Ujagare
देशात गाजलेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडात (जानेवारी १९७६ ते मार्च १९७७) राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह या चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. २७ नोव्हेंबर १९८३ रोजी या चौघांनाही येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती.
जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या हत्येप्रकरणी ‘खलिस्तान कमांडो फोर्स’चे अतिरेकी हरजिंदर सिंग जिंदा आणि सुखदेव सिंग सुखा हे मुख्य आरोपी होते. विशेष न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.
२५ जानेवारी २०१२ला सकाळी संतोष माने यानं स्वारगेट डेपोतून एक एसटी बस विनापरवानगी पळवून नेत बेदरकारपणे चालवत ९ जणांचा जीव घेतला होता, यात ३७ जण गंभीर जखमी झाले होते. सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली पण सुप्रीम कोर्टानं फाशी रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
संगणक अभियंता नयना पुजारी यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि खून करणाऱ्या तीन जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
७ ऑक्टोबर २००९ ला पुजारी या खराडी येथील कार्यालयातून घरी जाण्यासाठी कंपनीच्या वाहनाची वाट पाहत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. सामूहिक बलात्कार करत त्यांचा खून केला. फाशीची शिक्षा निश्चित करण्यासाठी सध्या खटल्याची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
पानशेत धरणाजवळील कुरण खुर्द येथील आदिवासी कातकरी समाजाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या संजय बबन काटकर (वय ३८, रा. कादवे, ता. वेल्हे) याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली होती. गेल्या फेब्रुवारी २०२१ मध्ये ही घटना घडली होती.
भोर तालुक्यातील नसरापूर इथं भीमराव कांबळे नामक ६५ वर्षीय एका मजुरानं गावात खेळत असलेल्या साडेतीन वर्षाच्या मुलीला खाऊचं आमिष दाखवत तिला गोठ्यातील वासरु दाखवतो असं सांगत अज्ञातस्थळी नेऊन अत्याचार आणि दगडाने ठेचून मारले. तसंच मृतदेह शेणामध्ये लपवून ठेवला.
१ मे २०२६ रोजी ही घटना घडली होती, १६ जून रोजी १२०० पानांचं आरोपपत्र दाखल झालं, २९ जून रोजी सत्र न्यायालयानं आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.