धनजंय मुंडेंची राज्यात किती घरं? पुणे, मुंबई अन्...

Amit Ujagare

मुंडेंचा राजीनामा

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सहा महिन्यांपूर्वी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पण अद्याप सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही.

Dhananjay Munde

बंगला कायम

मुलीची शाळा, वैद्यकीय कारणास्तव आपण अद्याप इथं राहत असल्याचं त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं.

Dhananjay Munde

मुंबईत फ्लॅट

पण मुंबईत मलबार हिल भागात वीरभवन सोसायटीत धनंजय मुंडेंचा सुमारे २१०० स्केअर फुटांचा एक फ्लॅट असल्याचं निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आलं आहे.

Dhananjay Munde

महाराष्ट्रातील घरं

या व्यतिरिक्त महाराष्ट्रात त्यांची आणखी किती घरं आहेत? आणि ती कुठे आहेत? हे जाणून घेऊयात.

Dhananjay Munde

परळीत घर

बीड जिल्ह्यातील परळी शहरात जलालपूर भागात सुमारे २७,००० स्केअर फुटांची मिळकत आहे.

Dhananjay Munde

पुण्यात घर

तसंच पुण्यातील शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनी इथं युगाई ग्रीन नावाची १,५३८ स्केअर फुटाची मिळकत आहे.

Dhananjay Munde

पुण्यात दुसरं घर

पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये श्री द्वारका हाऊसिंग सोसायटीत ९३० स्केअर फुटांचा फ्लॅट असून तो धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या नावावर आहे.

Dhananjay Munde

वडिलोपार्जित घर

बीडच्या परळीतील जलालपूर इथं १६,१४० स्केअर फुटांची मुंडेंची आणखी एक मिळकत आहे, ही वडिलोपार्जित असल्याचं त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

Dhananjay Munde