अमेरिका-इराण युद्धात किती भारतायांचा जीव गेला; कोणावर.. कुठे.. झाला हल्ला?

Amit Ujagare

1) अमेरिका-इराणमध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरु झालं आहे. त्यामुळं हार्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारताच्या व्यापारी जहाजांवर असलेल्या भारतीय नागरिकांवर आजवर १३ हल्ले झाले आहेत. यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

US-Iran War

2) एमकेडी व्योम

मार्शल आयलंडच्या नेदरलँडवरुन सौदी अरेबियाकडं जाणाऱ्या 'एमकेडी व्योम' नामक एका तेलवाहू जहाजावर इराणनं १ मार्च २०२६ रोजी मानवरहित नौकेद्वारे हल्ला केला. यामध्ये २१ पैकी १४ भारतीय नावीक होते, यांपैकी एकाचा मृत्यू झाला होता.

US-Iran War

3) एमटी स्कायलाईट

१ मार्च २०२६ रोजी एमटी स्कायलाईट नामक तेलवाहू जाहाजावर ओमानजवळच्या समुद्रात हल्ला झाला होता. यामध्ये २० नाविक होते त्यांपैकी १५ भारतीय होते, यांपैकी जहाजाचा भारतीय कॅप्टन आशिष कुमार आणि दिलीस सिंह नामक एका कर्चमाऱ्याचा मृत्यू झाला होता.

US-Iran War

4) एमटी सेफसी विष्णू

अमेरिकन मालकीचं तेलावाहू जहाज एमटी सेफसी विष्णू वर ११ मार्च २०२६ रोजी हल्ला झाला होता. इराकच्या बसरा इथल्या जवळच्याच खाडीमध्ये हा भीषण अपघात झाला होता. यामध्ये १६ भारतीय नागरिक सहभागी झाले होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला होता.

US-Iran War

5) ओमान

१३ मार्च २०२६ रोजी ओमानच्या सोहार शहरात झालेल्या एका इराणी ड्रोन हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्य झाला होता तसंच १० भारतीय जखमी झाले होते.

US-Iran War

6) सौदी अरेबिया

सौदी अरेबियाची राजधानी रियादवर १८ मार्च २०२६ रोजी एका इराणी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला होता. सौदीच्या जमिनीवर एखाद्या भारतीयाचा मृत्यू होणं ही पहिलीच मोठी घटना होती.

US-Iran War

7) युएई

२६ मार्च रोजी संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) अबुधाबीत झालेल्या एका मोठ्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकासह एका पाकिस्तानी नागरिकाचाही मृत्यू झाला होता.

US-Iran War

8) कुवैत

कुवैतवर २९ मार्च २०२६ रोजी झालेल्या भीषण इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला होता. संथानसेल्वम कृष्णन (वय ३७) असं या व्यक्तीचं नाव होतं. ही व्यक्ती तामिळनाडूच्या रामनाथपुरम येथील रहिवासी होता.

US-Iran War

9) कुवैतमध्ये पुन्हा हल्ला

कुवैत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल १ वर ३ जून रोजी एक भीषण इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. यामध्ये मंजूर अहमद (वय ५५) नामक एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला होता, ते मध्य प्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी होते.

US-Iran War

10) एमटी सेट्टेबेलो

१० जून रोजी ओमानच्या खाडीत होर्मुझ सामुद्रधुनीत एमटी सेट्टेबेलो नामक एका तेलावाहू जहाजावर अमेरिकन सैन्याच्यावतीनं हल्ला करण्यात आला होता. या युद्ध क्षेत्रात अमेरिकेच्या सैन्य कारवाईत भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची ही पहिली गंभीर घटना होती.

US-Iran War

11) जीएफएस गॅलेक्सी

इराणनं ओमानच्या तटाजवळ सायप्रसच्या एका जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी कंटेनर जहाजावर हल्ला केला होता. या जहाजावर ११ भारतीय नागरिक होते त्यापैकी १० जणांना वाचवण्यात यश आलं होतं तर एक जण बेपत्ता झाला होता.

US-Iran War

12) मोम्बासा

इराणी क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात ओमानच्या हद्दीतील समुद्रात हार्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिणेकडील भागातून जाणाऱ्या युएईच्या दोन तेल टँकर्सच्या मोम्बासा आणि अल बाहिया वर हल्ला केला होता. यामध्ये भारतीय चालक दलाच्या एका सदस्याचा मृत्यू झाला होता.

US-Iran War