सरकारनामा ब्युरो
मुंबईच्या दादर परिसरातील 'शिवाजी पार्क' हे राजकारणी, खेळाडू, आंदोलक आणि सर्वसामान्य मुंबईकर यांच्यासाठीच अत्यंत महत्वाचं मैदान.
कारण याच शिवाजी पार्कवर मुंबईतल्या राजकीय सभा सर्वांना माहितीच आहेत. विशेषतः बाळासाहेब ठाकरेंच्या सभा इथं गाजल्या आहेत. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांसाठी म्हणजेच प्रचारासाठीचं हे मैदान महत्वाचं साधन आहे.
राज ठाकरेंच्या मनसेचा पाडवा मेळावा तर शिवसेनेचा दसरा मेळावा वर्षानुवर्षे याच शिवाजी पार्कवर होत आला आहे. त्यामुळं मुंबईकरांसह महाराष्ट्राला शिवाजी पार्क किमान ऐकून तरी परिचयाचं झालं आहे.
याच मैदानावर क्रिकेटची खेळपट्टी आहे. क्लबचे असोत किंवा इतर क्रिकेटप्रेमी खेळाडू इथं दररोज सराव करत असतात. अनेक सर्वसामान्य नागरिक इथं मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. मुंबईत सरकारविरोधात आंदोलनंही याच मैदानावर होतात.
पण राजकीय सभांसाठी मुंबई महापालिका या मैदानासाठी भाडं आकरते. मुंबईतलं हे एक महत्वाचं मैदान त्यातही महत्वाच्या राजकीय सभा या ठिकाणी पार पडतात त्यामुळं या मैदानाचं भाडंही तसंच असणार.
पण आता राजकीय सभांसाठी देताना या मैदानाचं भाडं वाढवण्याचा विचार मुंबई महापालिकेकडून केला जात आहे. विशेष म्हणजे १२० टक्क्यांनी या मैदानाचं भाड वाढवण्याची महापालिकेची योजना आहे.
पण या भाडेवाढीनंतर राजकीय पक्षांसाठी हे मैदान परवडणारं ठरेल की नाही? हा प्रश्नच आहे कारण या भाड्यामध्ये प्रचंड मोठी वाढ होणार आहे. छोट्या पक्षांसाठी मात्र ही रक्कम खूपच मोठी ठरणार आहे.
सध्या मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर राजकीय सभेसाठी केवळ २५० रुपये इतंक एका दिवसाचं भाडं आकारलं जातं. यामध्ये जीएसटीची अधिकची रक्कम द्यावी लागते. तसंच २०,००० रुपये डिपॉझिट म्हणून पालिका आकारते.
जर मैदानाचं काही नुकसानं झालं तर त्याची भरपाई या डिपॉझिटमधून केली जाते. पण आता या मैदानाचं भाडं २५ ते ३०,००० हजार रुपये करण्याचा पालिकेचा मानस असून त्यासाठी सुमारे १ लाख रुपयांपर्यंत डिपॉझिट आकारण्यात येणार आहे.