अनुराधा धावडे
गेल्या काही महिन्यांपासून सुषमा अंधारे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.
आंबेडकर चळवळीतील एक सामाजिक कार्यकर्त्या, प्राध्यापिका, वक्ता, लेखिका अशी ओळख असलेल्या सुषमा अंधारेंना अलीकडच्या काळात शिवसेनेच्या फायर ब्रँड उपनेत्या म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे.
त्यांचा हा प्रवास अतिशय विलक्षण संघर्षांने भरलेला आहे. सुषमा अंधारे यांची सखोल अभ्यासपूर्वक राजकीय वक्तव्यांची नेहमीच चर्चा होत असते.
त्यांचा इथपर्यंतचा प्रवास अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही. सुषमा अंधारेंच्या भाषणाचीही नेहमीच चर्चा होत असते, त्यांच्या भाषा शैलीने अनेकदा विरोधकही अनुत्तरीत होतात.
पण तुम्हाला माहिती आहे का, कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी पीएचडी पर्यंतचे शिक्षण कस घेतलं? त्यांचा शिक्षणाचा हा प्रवास कुठून सुरु झाला.
सुषमा अंधारे या उत्तम प्राध्यापिका आहेत. त्यांनी एम.ए, बी.एड, पीएचडी, पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्या उत्कृष्ट लेखिकाही आहेत.
2003 - 2004 ला लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील कुमार स्वामी महाविद्यालयातून पहिल्यांदा ज्युनिअर प्राध्यापक म्हणून नोकरीला सुरुवात केली.
घरात कोणही उच्चशिक्षित नसतानाही त्यांनी आपल्या जिद्दीने शैक्षणिक पार्श्वभूमी मजबूत केली. सुषमा अंधारे यांनी नांदेड विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून शिक्षण घेतल आहे.