Amit Ujagare
अधिवेशन महत्वाच्या विषयांवर चर्चा सुरु असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळं आणि इतर विधानांमुळं माणिकराव कोकाटे यापूर्वी टीकेच धनी ठरले आहेत. यामुळं आता विरोधात त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
नाशिकच्या सिन्नरचे आमदार असलेल्या या माणिकराव कोकाटेंची संपत्ती किती आहे? तुम्हाला माहिती आहे का?
'माय नेता डॉट कॉम'च्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांचं शिक्षण बीएससी, एलएलबी इथंपर्यंत झालं आहे.
कोकाटे कुटुंबियांकडं चल संपत्तीपैकी ३१ लाख ३५ हजार ९२९ रुपयांची रोख रक्कम आहे. तर ३६ लाख ७५ हजार २३७ रुपयांच्या बँकेत ठेवी आहेत.
बॉण्ड आणि शेअर्समध्ये त्यांनी ४ कोटी ७८ लाख ६३ हजार २४४ रुपयांची गुंतवणूक आहे. तर पोस्टाच्या सेविंग खात्यात १ लाख ६० हजार रुपये आहेत.
याशिवाय पर्सनल लोन, महिंद्रा थार, इनोव्हा हायक्रॉस, बुलेट आणि सोनालिका ट्रॅक्टर तसंच सोनं हे मिळून ११ कोटी ७३ लाख ७० हजार ५६५ रुपयांची चल संपत्ती आहे.
त्यानंतर शेती, जमीन, कमर्शिअल आणि रहिवाशी इमारत मिळून अचल संपत्ती ३१ कोटी ५ लाख ४ हजार रुपये इतकी आहे. तर ७ कोटी ७५ लाख ४६ हजार ६८९ रुपये इतकं कर्ज त्यांच्यावर आहे.
अशी सर्व प्रकारची मिळून एकूण संपत्ती ४८ कोटी ३६ लाख ४१ हजार ८३९ रुपये इतकी आहे. तर ७ कोटी ७५ लाख ४६ हजार ६८९ रुपये इतकं कर्ज माणिकराव कोकाटे यांच्याकडं आहे.