नितीश कुमार 20 वर्षे मुख्यमंत्री राहिले; किती कमावली संपत्ती? आकडा बघून व्हाल अवाक्

Amit Ujagare

१) 20 वर्षे मुख्यमंत्री

सुमारे २० वर्षे बिहारच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले नितीश कुमार हे आपल्या साध्या जीवनशैलीमुळं कायम चर्चेत असतात.

Nitish Kumar

२) मोठं राजकीय करिअर

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोठं राजकीय करियर असतानाही त्यांच्या घोषीत संपत्तीची अनेक बड्या राजकारण्यांच्या संपत्तीशी तुलना केली जाते.

Nitish Kumar

३) राज्यसभा निवडणूक

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी प्रतिज्ञापत्रात आली संपत्ती जाहीर केली. हा संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

Nitish Kumar

४) प्रतिज्ञापत्रात संपत्ती जाहीर

पतिज्ञापत्रात नितीश कुमार यांची संपत्ती १.६६ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. यामध्ये त्यांची चल अचल अशा दोन्ही संपत्तींचा समावेश आहे.

Nitish Kumar

५) संपत्तीत काय?

या संपत्तीमध्ये बँकेतील ठेवी, थोडीशी जमीन आणि खासगी संपत्तीचा समावेश आहे. एकूणच राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये नितीश कुमार यांची संपत्ती सर्वात कमी आहे.

Nitish Kumar

६) वार्षिक संपत्ती किती?

याच प्रतिज्ञापत्रात त्यांची २०२४-२५ ची वार्षिक संपत्ती ७.८७ लाख रुपये असल्याची नोंद आहे. इतक्या वर्षाच्या राजकीय कार्यकाळात नितीश कुमार यांनी अत्यंत कमी संपत्ती जमवली आहे.

Nitish Kumar

७) संपत्तीच ब्रेकअप

त्यांच्या एकूण संपत्तीत १.६६ कोटी रुपयांमध्ये चल संपत्ती १७.९१ लाख, बँकेत जमा असलेले पैसे २०५५२ रुपये, सोनं-चांदीची एकच २० ग्रॅमची अंगठी त्यांच्याकडं आहे. याची किंमत २.३७ लाख आहे.

Nitish Kumar

८) वैयक्तिक कार

त्याचबरोबर नितीश कुमार यांच्याकडं एक इकोस्पोर्ट्स कार असून ती त्यांनी २०१५ मध्ये खरेदी केली होती. ११.३२ लाख रुपयांत त्यांनी ही कार खरेदी केली होती.

Nitish Kumar

९) दिल्लीत फ्लॅट

दिल्लीतील द्वारका भागात त्यांनी २००४ मध्ये एक फ्लॅट १३.७८ लाखांना विकत घेतला होता. १००० स्केअर फूटचा हा फ्लॅट असून त्याची सध्याची किंमत १.५ कोटी रुपये आहे.

Nitish Kumar