Rashmi Mane
आता तुम्ही तुमच्या फोनवरूनही पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला mPassportSeva नावाचे अॅप डाउनलोड करावे लागेल. पासपोर्टसाठी अर्ज करण्याचे सर्व काम यावर केले जाते.
जर तुम्ही पहिल्यांदाच पासपोर्टसाठी अर्ज करणार असाल तर पहिल्यांदा अॅपमध्ये नाव रजिस्टर करा.
आता तुम्ही नवीन पासपोर्ट बनवणार असल्याने, नवीन पासपोर्टसाठी अर्ज करा हा पर्याय निवडा.
तुम्हाला नवीन पासपोर्ट बनवायचा नसला तरीही, हे अॅप तुमच्यासाठी उपयुक्त आहे. लॉग इन केल्यानंतर, पासपोर्ट पुन्हा री-इशू करू शकता, येथे पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवता येते.
नवीन पासपोर्ट बनवण्याचा फॉर्म जवळ जवळ 9 पानांचा आहे. ते काळजीपूर्वक भरा. आधी कुठेतरी सर्व माहिती लिहून ठेवा आणि नंतर तुमचा फॉर्म आरामात भरा.
पूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुमचे पासपोर्ट ऑफिस निवडा. तुम्ही तुमच्या परिसरातील जवळचे कार्यालय निवडू शकता.
जवळचे पासपोर्ट कार्यालय निवडल्यानंतर, उपलब्ध तारखांमधून निवडावी लागते. यानंतर, तुम्हाला निवडलेल्या तारखेला पासपोर्ट कार्यालयात पोहोचावे लागेल आणि तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल.
यानंतर काही दिवसांत तुमचे पोलिस पडताळणी होईल. यानंतर पासपोर्ट तुमच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवला जाईल.