Rashmi Mane
भारतीय हवाई दलात (Indian Air Force) पायलट होणं अनेकांचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न साकार करण्यासाठी कोणता मार्ग घ्यावा लागतो, हे जाणून घ्या!
12वी विज्ञान शाखेतून (Physics, Maths) किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे.
इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक.
12वी नंतर UPSC मार्फत घेतली जाणारी NDA परीक्षा उत्तीर्ण करा.
लेखी परीक्षा + SSB मुलाखत + वैद्यकीय तपासणी आवश्यक.
निवड झाल्यावर NDA( पुणे) येथे प्रशिक्षण.
एनडीए परीक्षा ही केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी द्वारे आयोजित केली जाते.ब्रांचमध्ये भरती
एनडीए मार्फत, त्यांच्या फ्लाइंग ब्रांच, ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ब्रांचमध्ये भरती केली जाते.
युपीएससी वैमानिक बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा म्हणजेच सीडीएसई परीक्षा देखील आयोजित करते.
निवड झाल्यावर AFA (Air Force Academy, डुंडीगल) येथे प्रशिक्षण. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कमीशन प्राप्त होतो आणि पायलट म्हणून नियुक्ती.
उमेदवारांना अधिकारी म्हणून किंवा कोणत्याही आयएएफ स्टेशनवर पायलट म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.