सरकारनामा ब्यूरो
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला अमेरिकेहून भारतात आणले आहे. यानंतर त्याला एनआयएने ताब्यात घेत गुरुवारी(ता.10) त्यांची चौकशी करण्यात आली. दिल्ली पटियाला हाऊल कार्टामध्ये त्यांनी त्यांच्या गुन्ह्यांची कबुलीही दिली.
दहशतवादी तहव्वूर राणा यांची चौकशी करणारी एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते वाचा...
एनआयए ही खूप मोठी आणि महत्त्वाची यंत्रणा असते. ही यंत्रणा दहशतवादी, गुन्हेगारी,शस्त्रास्त्र व्यापार, अंमली पदार्थांची तस्करी संबधित प्रकरणांची तपास करते.
गृह मंत्रालयाच्या (MHA) अंतर्गत काम करते आणि केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या प्रकरणांची चौकशी करते.
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशनची पदवी असावी लागते. यानंतर SSC अंतर्गत आयोजित केलेल्या CGL (Combined Graduate Level) परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते.
उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक तंदुरुस्ती आणि निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, शारीरिक चाचण्या आणि मुलाखती असा सगळा टप्पा यात असतो.
लेखी, मौखिक परीक्षेनंतर खास प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर,सब-इंस्पेक्टरपदासाठी संधी मिळते.
एनआयएमध्ये नोकरी मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या पद आणि अनुभवानुसार वेतन दिले जाते. दरमहा 29,200 ते 92,300 रुपये इतके वेतन मिळते. तर, वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याला 56,100 ते 1,77,500 रुपये इतके वेतन दिले जाते.