मेडिकलमधील असली-नकली औषधं कशी ओळखाल?

Amit Ujagare

1) विविध आजारांवरील औषधं ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत संवेदनशील बाब आहे. पण पैसा कमावण्यासाठी आता बनावट औषधंही बाजारात येतात पण ती कशी ओळखायची जाणून घेऊयात.

Medicine

2) औषधं कुठून खरेदी करावीत?

तत्ज्ञांच्या मते, फार्मसी आणि केमिस्ट हे दोन्ही एक प्रकारे मेडिकल स्टोअर्सच आहेत. पण त्यांच्याकडं औषध विक्रीचं वैध लायसन्स असणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही मेडिकल स्टोअरमधून औषध घेता येतात पण डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय औषधं घेऊ नयेत.

Medicine

3) बनावट औषधांचं प्रमाण किती?

मेरठ डिव्हीजनचे ड्रग्ज इंस्पेक्टर अरविंद कुमार गुप्ता यांच्या माहितीनुसार, बाजारात बनावट औषधांचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. जे सुमारे ०.००१ टक्के इतकं आहे.

Medicine

4) बनावट औषधं काय असतात?

गुप्ता यांच्या माहितीनुसार, ज्या औषधामध्ये आजारापासून दिलासा देणारं योग्य प्रमाणात आणि परिणामकारक पदार्थ नसतात किंवा मग ओरिजिनल औषधाप्रमाणं दिसणारं केवळ दुसरं काहीतरी पदार्थ वापरलेला असतो त्याला बनावट औषधं म्हणतात.

Medicine

5) जास्त डिस्काऊंटची औषधं बनावट असतात?

तज्ज्ञांच्या मते, ज्या औषधांवर जास्त प्रमाणात डिस्काऊंट दिला जातो ती औषधं बनावटच असतात असं नाही. भारतात दोन प्रकारची औषधं असतात एथिकल आणि जेनरिक. एथिकल औषध हे डॉक्टर्स लिहून देतात जी विशिष्ट ब्रँडची असतात त्याची मार्केटिंग मोठ्या प्रमाणावर केली जाते.

Medicine

6) तर जेनरिक औषध ही मूळ कंटेन्टची औषध असतात, ती कुठल्याही विशिष्ठ ब्रँडच्या नावानं नव्हे तर सायंटिफिक नावानं ओळखली जातात. त्यामुळं या औषधांवर जास्त मार्जिन मिळत असल्यानं ती तुलनेत खूपच स्वस्त असतात.

Medicine

7) बनावट औषधं कशी ओळखायची?

जर तुम्हाला बनावट औषधांपासून वाचायचं असेल तर कायम बिल मागून घ्या. औषधं घेताना कायम बॅच क्रमांक आणि एक्सापयरी डेट तपासून घ्या. बनावट औषध बऱ्याचदा विना पावती विकली जातात.

Medicine

8) क्युआर कोडनं औषध ओळखा

सरकारनं सुमारे ३०० औषधांच्या ब्रँडमध्ये क्युआर कोड अनिवार्य केले आहेत. हा क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर त्या औषधाची इत्यंभूत माहिती स्क्रीनवर दिसते. जर क्युआर कोड स्कॅन होत नसेल तर कंपनीकडं तक्रा करा.

Medicine