Mangesh Mahale
Google Play Store मधून पुढील अधिकृत App डाउनलोड करा: Jeevan Pramaan Face App, Aadhaar FaceRD App (चेहरा प्रमाणीकरणासाठी) App चा प्रकाशक सरकारी (MeitY / UIDAI) आहे का ते तपासा
Jeevan Pramaan App उघडा. नवीन असाल तर Operator Authentication पूर्ण करून, पेन्शनधारकासाठी Pensioner Authentication निवडा.
12 अंकी आधार क्रमांक टाका.मोबाईल क्रमांक (आधारशी लिंक) टाका.ई-मेल (असल्यास) टाका. OTP येईल, तो टाकून पुढे जा.
मोबाईलचा फ्रंट कॅमेरा चेहऱ्यासमोर धरा.चांगल्या प्रकाशात उभे रहा.चष्मा, टोपी, मास्क काढा.सूचना येईल तेव्हा डोळ्यांची उघडझाप (blink) करा. चेहरा जुळल्यावर “Authentication Successful” संदेश दिसेल.
PPO क्रमांक, पेन्शन खाते क्रमांक, पेन्शन देणारी संस्था / बँक निवडा Sanctioning Authority आणि Disbursing Agency निवडा
सर्व माहिती तपासून Submit करा. स्क्रीनवर “Life Certificate Submitted Successfully” असा संदेश येईल. तुम्हाला Life Certificate ID (PPN) मिळेल. तो जपून ठेवा. SMS द्वारेही कन्फर्मेशन येते
हयातीचा दाखला म्हणजे पेन्शनधारक जिवंत आहे याचा पुरावा. इंग्रजीत याला Life Certificate म्हणतात, डिजिटल पद्धतीत त्याला जीवन प्रमाण (Jeevan Pramaan) असे नाव आहे.
पेन्शन देणाऱ्या संस्थेला (बँक, कोषागार, पोस्ट, EPFO इ.) दरवर्षी खात्री करावी लागते की पेन्शन घेणारी व्यक्ती हयात आहे. म्हणून हा दाखला मागितला जातो