Amit Ujagare
या एअरपोर्टमुळं आसपासच्या छोट्या आणि लघु उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढेल, नवे उद्योग, नवी उपक्रम तयार होतील.
मी यापूर्वीच म्हटलं होतं की या देशातील हवाई चप्पल घालणाऱ्या व्यक्तीला हवाई प्रवास करता येईल.
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशभरात नवे एअरपोर्ट बनवले जावेत असा प्रस्ताव मी मांडला होता. त्यानुसार आमच्या सरकारनं या मिशनवर गांभीर्यानं काम केलं.
त्यानुसार, गेल्या अकरा वर्षात एकामागून एक एअरपोर्ट तयार होत गेले. २०१४ मध्ये आमच्याकडं केवळ ७४ एअरपोर्ट होते, पण आता भारतात एअरपोर्टची संख्या १६०च्या पार गेली आहे.
जेव्हा छोट्या छोट्या शहरांमध्ये एअरपोर्ट तयार होतात तेव्हा तिथल्या लोकांना हवाई प्रवासासाठी पर्याय मिळत राहतात. यातही रास्त दरात प्रवासासाठी आम्ही उडाण योजना सुरु केली.
उडाण योजनेमुळं गेल्या दशकात लाखो लोकांनी पहिल्यांदा हवाई प्रवास केला आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं. यामुळं भारत जगातील तिसरं सर्वाधिक एव्हिएशन मार्केटही बनलं आहे.
या नव्या एअरपोर्टमुळं महाराष्ट्रातील शेतकरी हे युरोप आणि मध्य आशियातील सुपर मार्केटसोबत जोडले जातील.
म्हणजेच भारतीय शेतकऱ्याचा ताजा माल जसं की फळे, फुलं आणि भाज्या आणि मच्छिमारांची उत्पादनं वेगानं ग्लोबल मार्केटपर्यंत पोहोचेल.