Rashmi Mane
आतापर्यंत राज्यभरात 60% टक्के वाहनांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट (HSRP) लावली गेली आहे.
मुंबई रीजनमध्ये अंधेरी या बाबतीत आघाडीवर आहे, तर राज्यात पुणे आरटीओ ही विभागीय पातळीवर सर्वाधिक वाहने HSRP लावण्याच्या यादीत पुढे आहे.
वाहनांवर HSRP लावण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. यानंतर वाहनधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
1 डिसेंबरपासून, ज्या वाहनांवर HSRP लावलेली नसेल, त्यांच्याविरुद्ध एअर स्पीड स्क्वॉडमार्फत कारवाई सुरू होईल.
जर तुमच्या जुन्या वाहनांवर नंबर प्लेट नसेल तर अशा वाहनांवर पुन्हा नोंदणी, वाहन बदल, लाइसन्स नूतनीकरण यांसारख्या सर्व कामकाजावर बंदी घालण्यात येईल.
या प्लेट्समुळे वाहन चोरी आणि नंबर प्लेटमध्ये छेडछाड करणे कठीण होते.
एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांवर ही प्लेट लावणे आवश्यक आहे आणि 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल.
आजचं करा अर्ज अन्यथा दंड लागू शकतो. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करून आणि शुल्क भरून ही प्लेट मिळवू शकता.