IAS Amit Kataria: फक्त एक रुपया वेतन घेतात..; कोण आहेत अमित कटारिया..?

सरकारनामा ब्यूरो

अमित कटारिया

आयपीएस आणि आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्नं पाहण्यामागं सेफ नोकरी, तगडं पेमेंट, आजूबाजूला मोठा फौजफाटा, सुखसोयींनी समृध्द लाईफस्टाईल हेच कारण असतं. पण काहीजण खरंच त्याला नक्कीच अपवाद असतात. त्यापैकीच एक अमित कटारिया.

IAS Amit Kataria | Sarkarnama

व्यावसायिक कुटुंब

अमित कटारिया हे नावाजलेल्या व्यावसायिक कुटुंबातील आहेत. रिअल इस्टेटमध्ये ते सतत सक्रीय असतात. दिल्ली तसेच आजूबाजूच्या परिसरातही त्यांचा हा व्यवसाय आहे.

IAS Amit Kataria | Sarkarnama

श्रीमंत 'आयएएस'

पण महत्त्वाची आणि आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे हरियाणातील गुरुग्राम येथील अमित कटारिया भारतातील सर्वात श्रीमंत 'आयएएस' अधिकाऱ्यापैकी एक म्हणून ओळखले जातात.

IAS Amit Kataria | Sarkarnama

शिक्षण

दिल्ली येथील पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर केलं.

IAS Amit Kataria | Sarkarnama

'आयएएस' साठी निवड

2003 मध्ये UPSC परीक्षा देत त्यांनी 18 वा क्रमांक पटकावला. त्यानंतर त्यांची निवड 'आयएएस' या पदासाठी करण्यात आली.

IAS Amit Kataria | Sarkarnama

एक रुपये सॅलरी

2019 मध्ये त्यांचं वेतन हे 56 हजार रुपये इतके होते. त्यांचे इतर भत्ते मिळून एकूण वेतन 1.40 लाख आहे. परंतु ते केवळ एक रुपये इतकी सॅलरी घेतात. ते सांगतात की, मी पैशांपेक्षा जास्त माझ्या कामावर आणि लोकांच्या सेवेवर लक्ष केंद्रित करतो.

IAS Amit Kataria | Sarkarnama

नरेंद्र मोदींची भेट चर्चेचा विषय

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा प्रदेश दौऱ्यावर होते, तेव्हा अमित यांनी मोदींना भेटताना काळ्या रंगाचा गडद चष्मा लावल्यानं ते खूप चर्चेत आले होते.

IAS Amit Kataria | Sarkarnama

सध्या पोस्टिंग

आता त्यांचं पोस्टिंग छत्तीसगड येथे करण्यात आलेली आहे.

IAS Amit Kataria | Sarkarnama

Next : IPS झाली अभिनेत्री, मोठ्या स्क्रिनवर अजमवणार नशिब

येथे क्लिक करा...