Rashmi Mane
प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अनू कुमारी यांनी लग्न झाल्यानंतर जिद्द आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर 'आयएएस' होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
अनू कुमारी यांनी 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती.
आयएएस अधिकारी अनू कुमारी मूळच्या हरियानातील सोनीपत येथील आहेत.
अनू कुमारी यांनी दिल्ली विद्यापीठातून भौतिकशास्त्रात 'बीएससी' (ऑनर्स) पदवी प्राप्त केली आहे आणि आयएमटी, नागपूर येथून एमबीए (फायनान्स आणि मार्केटिंग) केले आहे.
एमबीए केल्यानंतर IAS अनू कुमारी यांनी मुंबईतील ICICI बँकेच्या शाखेत काम करायला सुरुवात केली.
जवळपास 9 वर्षे काम केल्यानंतर अनू कुमारी यांनी 'यूपीएससी'ची तयारी सुरू केली. 2016 मध्ये त्या पहिल्यांदा परीक्षेला बसल्या.
'यूपीएससी' परीक्षेची तयारी करत असताना अनू कुमारीचा मुलगा अवघ्या 4 वर्षांचा होता. त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देणे त्यांना अवघड जात होते.
अनू कुमारी यांनी आपल्या मुलाला दोन वर्षांसाठी स्वतःपासून दूर आईकडे पाठवले. आणि संपूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.