Rashmi Mane
देशातील सर्वात कठीण परीक्षा यूपीएससी! लाखो लोकांचं स्वप्नं आणि फक्त मोजकेच यशस्वी. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे गरिमा अग्रवाल यांची.
गरिमा अग्रवाल मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्याच्या. त्यांचं कुटुंब व्यवसायात असूनही, गरिमा यांना वेगळी ओळख निर्माण करायची होती. 10वीला 92% आणि 12वीला 89% गुण!
गरिमा यांनी JEE परीक्षेत यश मिळवून IIT हैदराबादमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं. नंतर त्या जर्मनीला इंटर्नशिपसाठी गेल्या. पण त्यांच्या डोळ्यासमोर एकच स्वप्न UPSC!
UPSC च्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 240वी रँक मिळवली. त्या IPS अधिकारी झाल्या. पण गरिमा यांचं अंतिम लक्ष्य होतं IAS बनणं.
IPS ट्रेनिंगसोबतच गरिमा यांनी दुसऱ्यांदा UPSC ची तयारी सुरू ठेवली. त्यांनी मागील चुका ओळखून त्या सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं.
2018 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात गरिमा यांनी UPSC परीक्षेत 40वी रँक मिळवली आणि त्या IAS अधिकारी झाल्या!
गरिमा यांचं मत आहे की UPSC साठी प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू यांची तयारी एकत्रितपणे करा. आत्मचिंतन करा आणि सातत्य ठेवा."
गरिमा अग्रवाल यांची कहाणी सर्व UPSC उमेदवारांसाठी प्रेरणादायी आहे. चिकाटी, मेहनत आणि ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास अशक्य काहीच नाही!