Rashmi Mane
देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आजपासून पदभार स्वीकारला आहे.
१९८८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांचा जन्म २७ जानेवारी १९६४ रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला.
त्यांचे सुरुवातीचे शिक्षण वाराणसीच्या क्वीन्स कॉलेज आणि लखनऊच्या कॅल्विन तालुकदार कॉलेजमधून झाले आहे.
आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक, आयसीएफएआयमधून बिझनेस फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी आणि हार्वर्ड विद्यापीठातून पर्यावरण अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
एर्नाकुलमचे सहाय्यक जिल्हाधिकारी, अडूरचे उपजिल्हाधिकारी, केरळ राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, केरळमधील कोचीन महानगरपालिकेचे महानगरपालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
केंद्र सरकारने त्यांना श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले होते. राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या बालरूपाच्या मूर्तीची निवड करण्यासाठी ते ज्युरीमध्येही होते.