Civil Servants TO Politics : प्रशासनातून येत राजकारण गाजवणारे 10 दबंग नेते

सरकारनामा ब्यूरो

प्रशासकीय सेवा ते राजकीय नेते

काही धडाकेबाज IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी प्रशासकीय सेवेत मोलाची कामगिरी केली, तसेच राजकरणात येत राजकीय पदावर महत्त्वाच्या कामे केली. कोण आहेत हे नेते वाचा...

IAS to politics | Sarkarnama

राजकुमार सिंह

1975 बॅचच्या IAS अधिकारी राज कुमार सिंह हे बिहार केडरच्या केंद्रीय गृहसचिव या पदावर कार्यरत होते. 2013 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय कारकीर्द घडवली.

IAS to politics | Sarkarnama

हर्षदीप सिंग पुरी

1974 ला हर्षदीप सिंग पुरी यांनी भारतीय परराष्ट्र सेवेतून त्यांच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. जानेवारी 2014 ला त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. सप्टेंबर 2017 मध्ये ते केंद्रीय मंत्री झाले.

IAS to politics | Sarkarnama

के अन्नामलाई

अन्नामलाई कुप्पुसामी हे 2011 ला UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IPS झाले. 25 ऑगस्ट 2020 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

K Annamalai | Sarkarnama

शशिकांत सेंथिल

शशिकांत सेंथिल हे कर्नाटक केडरचे माजी IAS अधिकारी होते. 2019 मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

IAS to politics | Sarkarnama

मणिशंकर अय्यर

मणिशंकर अय्यर हे 1963 ला भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले. 1989 ला राजकारणात प्रवेश करायचा असल्याने त्यांनी सर्व सेवेतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

IAS to politics | Sarkarnama

मीरा कुमार

1973 ला मीरा कुमार यांनी सार्वजनिक सेवेला सुरुवात केली होती. पण नंतर राजकारण येत 2009 ते 2014 या कालावधीत लोकसभेचे अध्यक्षपद भूषवले.

IAS to politics

यशवंत सिन्हा

यशवंत सिन्हा यांची 1960 ला IAS झाले. 1984 पर्यंत त्यांनी प्रशासन सेवेत काम केले. राजकारणात प्रवेश करत जनता दलाचे सदस्य म्हणून 1990-91 दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

IAS to politics | sarkarnama

नटवर सिंग

1953 ला भारतीय परराष्ट्र सेवेत (IFS) म्हणून रुजू झाल्यानंतर नटवर सिंग यांनी 31 वर्षे या पदावर काम केले. त्यांनी आठव्या लोकसभेत यशस्वीपणे निवडणूक लढवली.

IAS to politics | sarkarnama

अल्फोंस कन्ननथनम

अल्फोंस कन्ननथनम यांनी IAS अधिकारी म्हणून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. भाजपमध्ये प्रवेश करत ते मोदी सरकारचे केरळमधील पहिले मंत्री ठरले.

IAS to politics | sarkarnama

अजित जोगी

अजित जोगी हे 1968 च्या बॅचमधून IAS अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर राजकारणात प्रवेश करायचा निर्णय घेत त्यांनी नोकरी सोडली. 2000 ते 2003 पर्यंत छत्तीसगडचे ते पहिले मुख्यमंत्री होते.

IAS to politics | sarkarnama

NEXT : ठाकरे गटाने जाहीर केली प्रवक्त्यांची यादी, जाणून घ्या, कुणाला मिळाले आहे स्थान?

<strong>येथे क्लिक करा...</strong>