IAS Manuj Jindal : NDA मध्ये अनफिट ठरूनही त्यांनी यशाचे शिखर गाठलेच... IAS मनुज जिंदाल यांचा प्रेरणादायी यशोगाथा!

Rashmi Mane

UPSC परीक्षा

UPSC परीक्षा उत्तीर्ण करणे हे निश्चितच अवघड काम आहे. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC साठी अर्ज करतात, परंतु त्यापैकी काहीच लोक ही परीक्षा उत्तीर्ण होतात.

IAS Manuj Jindal | Sarkarnama

सक्सेस स्टोरी

अशीच सक्सेस स्टोरी आहे मनुज जिंदाल यांची. ज्यांनी UPSC परीक्षेत अखिल भारतीय 53 व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. पण तुम्हाला माहीत आहे का IAS मनुज जिंदाल कोण आहेत?

IAS Manuj Jindal | Sarkarnama

शिक्षण

मनुज जिंदाल हे मूळचे गाझियाबादचे रहिवासी आहेत. सुरुवातीच्या शिक्षणानंतर ते डेहराडून येथील शाळेत शिकायला गेले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी एनडीएमध्ये प्रवेश केला.

IAS Manuj Jindal | Sarkarnama

अपात्र

प्रशिक्षणादरम्यान त्यांनी पहिल्या टर्ममध्ये चांगली कामगिरी केली. पण, दुसऱ्या टर्ममध्ये चिंता आणि नैराश्याचे बळी ठरले. त्यांची प्रकृती खालावल्याने अकादमीने त्यांना अभ्यासक्रमातून अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला होता.

IAS Manuj Jindal | Sarkarnama

परदेशात शिक्षण

यानंतर त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ठरवले आणि व्हर्जिनिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याला बार्कलेजकडून ऑफर मिळाली, जिथे त्याने तीन वर्षे चांगल्या पगाराच्या पॅकेजवर काम केले.

IAS Manuj Jindal | Sarkarnama

अपयश

मनुज यांनी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली पण त्यांना अपयश आले. मात्र, 2017 मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा परीक्षा दिली आणि 53 वा क्रमांक मिळवत यूपीएससी उत्तीर्ण झाले.

IAS Manuj Jindal | Sarkarnama

पुस्तक

जिंदाल यांनी 'असेसिंग द आर्ट ऑफ आन्सर रायटिंग' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

IAS Manuj Jindal | Sarkarnama

YouTube चॅनल

IAS मनुज एक YouTube चॅनल देखील चालवतात ज्यामध्ये ते लोकांना मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थ्यांना UPSC तयारीबद्दल सांगतात.

IAS Manuj Jindal | Sarkarnama

Next : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर कोण आहेत उमेदवार?

येथे क्लिक करा