IAS Officer : नक्की किती असतो IAS अधिकाऱ्याचा पगार?

Rashmi Mane

'यूपीएएसी'

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन देशसेवा करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते.

Women Ambassadors Officers of India | Sarkarnama

पायाभूत अभ्यासक्रम

मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) येथे एका IAS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होते.

IAS Officer | Sarkarnama

कसे मिळते पद ?

या परीक्षेतील टॉप रँकर्सना 'आयएएस' पद मिळते, परंतु अनेक वेळा टॉप रँकर्स 'आयपीएस' किंवा 'आयएफएस' पद निवडतात.

IPS, IAS Officers in India | Sarkarnama

प्रशिक्षणानंतर...

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना त्यांच्या केडरमध्ये पाठवलं जातं. तिथे त्यांच्या क्षेत्रातली किंवा विभागातली प्रशासकीय जबाबदारी सोपवली जाते. संबंधित क्षेत्राच्या विकासासाठी प्रस्ताव बनवण्यासाठी व सरकारी धोरण लागू करण्यासाठी तसेच महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या उमेदवारांना काही अधिकार दिले जातात.

Varsha Thakur IAS | Sarkarnama

अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या

'आयएएस' अधिकाऱ्यांकडे जिल्ह्याच्या सगळ्या विभागांची जबाबदारी असते. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना पोलिसांच्या विभागासोबतच इतरही विभागांचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी असते. 

IAS Ria Dabi | Sarkarnama

अधिकार

जिल्ह्याच्या पोलिस खात्याची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांवर असते. जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात कलम 144 अंतर्गत काही महत्त्वाचे निर्णय घेणं, आदेश लागू करणं हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतात.

IAS Officer | Sarkarnama

अधिकार

गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबाराचे आदेश देणं, याचेही अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतात.

IAS Pari Bishnoi

वेतन

सातव्या वेतन आयोगानुसार, 'आयएएस' अधिकाऱ्यांना 56,100 रुपये ते 2.5 लाख रुपये प्रतिमहिना असे वेतन मिळतं. मूळ वेतन, ग्रेड पे यांच्याव्यतिरिक्त डियरनेस अलाउन्स, मेडिकल अलाउन्स आणि कन्व्हेन्शन अलाउन्सही मिळतो.

IAS Anu Kumari | instagram.com/iasanukumari/

सुविधा

'आयएएस' अधिकाऱ्यांना बंगला, स्वयंपाकी, माळी, सुरक्षारक्षक आणि घरगुती कामासाठी सहायक अशा विविध सुविधा सरकारकडून मिळतात.

IAS Sonal Goel | Sarkarnama

Next : 'ब्यूटी विथ ब्रेन'चे उत्तम उदाहरण आयएएस रिया डाबी 

येथे क्लिक करा