IAS Shilpa Gupta : अवघ्या 24व्या वर्षी IAS बनल्या, आता निघालं अटक वॉरंट; कोण आहेत शिल्पा गुप्ता?

Rajanand More

IAS

IAS ऑफिसर चे काम हे उच्च स्थरावरचे असल्याने त्यांना बऱ्याचदा त्यांच्या कामामुळे अनेक संकटांना समोरे जावे लागते.

IAS | Sarkarnama

शिल्पा गुप्ता

अवघ्या 24 व्या वर्षी आयएएस अधिकारी बनल्या पण कायदेशीर अडचणीत अडकल्या, कोण आहेत मध्य प्रदेश केडरमधील आयएएस शिल्पा गुप्ता जाणून घेऊयात.

IAS Shilpa Gupta | एोीकोीलोसो

अटक वॉरंट

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने त्यांच्याविरुध्द जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 23 मार्च 2025 या तारखेला अहवालासह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे.

IAS Shilpa Gupta | Sarkarnama

काय आहे प्रकरण?

सिहोर येथील हरिओम यादव आणि इतर याचिकाकर्त्यांनी त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मते, गुप्ता यांनी 50 हून अधिक शिक्षकांना अनारक्षित वर्गातून अदिवासी कल्याण शाळेत भरती केल्याचा आरोप केला आहे.

IAS Shilpa Gupta | Sarkarnama

नोटिशीला उत्तर नाही

याचिकेमुळे शिल्पा यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावत 3 मार्च पर्यंत यांचे उत्तर देण्यास सांगितले होते, पण अजूनही त्त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थेट अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

IAS Shilpa Gupta | Sarkarnama

यापूर्वीही चर्चेत

कामात निष्काळजीपणा दाखवल्याने शिल्पा गुप्ता यांनी 200हून अधिक शिक्षकांना निंलबित केले आहे. तसेच त्यांनी त्यांची पगारवाढही थांबवली आहे. यामुळे त्या चर्चेच्या विषय बनल्या आहेत.

IAS Shilpa Gupta | Sarkarnama

दिल्लीच्या रहिवासी

दिल्लीच्या रहिवासी असलेल्या शिल्पा गुप्ता यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेतून आणि जामिया मिलिया इस्लामिया येथून बीए आणि एमए केले.

IAS Shilpa Gupta | Sarkarnama

बंगालमध्ये नियुक्ती

2007ला त्यांनी UPSCCSE ची परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी 54वा क्रमांक मिळवला. त्यांचे पती अजय हे सुद्धा मध्यप्रदेश केडरमधील IAS अधिकारी आहेत.

IAS Shilpa Gupta | Sarkarnama