Aslam Shanedivan
आजच्या काळात, जिथे लग्न समारंभासाठी कोट्यवधींचे बजेट काढले जाते. शाही थाटामाट लावला जातो. तिथे दोन तरुण आयएएस अधिकाऱ्यांच्या कोर्ट मॅरेजची सध्या चर्चा होत आहे
राजस्थानच्या अलवरचे एसडीएम माधव भारद्वाज आणि गुजरातच्या जामनगरच्या एसडीएम अदिती वास यांच्या लग्नाची ही चर्चा असून ती देशभर चर्चेत आहे
2023 बॅचचे हे दोन्ही अधिकारी असून ते बुधवारी विवाहबंधनात अडकले. त्यांनी कोर्ट मॅरेज करत लग्नांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि बडेजावला छेद दिला आहे.
मसुरीचे माधव आणि उत्तर प्रदेशच्या बरेली येथील अदिती यांची भेट प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणादरम्यान झाली होती. येथेच मैत्री आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेम झाले.
यानंतर आता त्यांनी लग्न केले असून आता त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर साधे पणाने केलेल्या या लग्नाचे कौतुक होत आहे.
त्यांनी अलवरच्या जिल्हाधिकारी अर्पिता शुक्ला यांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज करत एकमेकांना हार घालून विवाह विधी आटोपला.
माधव भारद्वाज हे २०२३ बॅचचे अधिकारी आहेत. लोकोमोटर दिव्यांगत्व असूनही जिद्दीने त्यांनी हे यश मिळवले असून यूपीएससीमध्ये ५३६ वी रँक मिळवली.
तर अदिती वास यांनी पहिल्याच प्रयत्नात ५७ वी रँक पटकावली आहे. अदिती या उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्याच्या असून त्या दिल्लीच्या मिरांडा हाऊसच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
उच्चशिक्षित आणि उच्च पदावर असलेल्या व्यक्तींनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. समाजाला नवा संदेश त्यांनी दिलाय.