IAS Pallavi Mishra : कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या 'आयएएस' पल्लवी मिश्रा

Rashmi Mane

73 वा क्रमांक

भोपाळमध्ये राहणाऱ्या पल्लवी मिश्रा यांनी नागरी सेवा परीक्षेत 73 वा क्रमांक पटकावत मोठे यश मिळवले आहे.

IAS Pallavi Mishra | Sarkarnama

शिक्षण

पल्लवी मिश्रा यांनी त्यांचे शालेय शिक्षण भोपाळच्या 'कार्मेल कॉन्व्हेंट सीनियर सेकेंडरी स्कूल'मधून पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी 'नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी', दिल्ली येथून कायद्याची पदवी घेतली आहे.

Pallavi Mishra | Sarkarnama

'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण

कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात पल्लवी यांनी 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Pallavi Mishra | Sarkarnama

8 ते 9 तास अभ्यास

परीक्षेची तयारी करण्यासाठी पल्लवी रोज सलग 8 ते 9 तास अभ्यास करायच्या.

Pallavi Mishra | Sarkarnama

यशाचे श्रेय

पल्लवी मिश्रा यांच्या यशाचे श्रेय त्यांचा मोठा भाऊ 'आयपीएस' अधिकारी आदित्य मिश्रा यांचे आहे. त्यांनी पल्लवी यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याची प्रेरणा दिली.

Pallavi Mishra | Sarkarnama

कौटुंबिक पार्श्वभूमी

पल्लवी मिश्रा यांचे वडील अजय मिश्रा हे वकील असून त्यांची आई डॉ. रेणू मिश्रा या साई महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तसेच त्यांचा मोठा भाऊ इंदोरमध्ये पोलीस उपायुक्त, 'डीएसपी' आहे.

Pallavi Mishra | Sarkarnama

अपयशावर मात

पल्लवी मिश्रा यांनी पहिल्यांदा 'यूपीएससी' परीक्षा दिली तेव्हा त्या मुख्य परीक्षा पास करू शकल्या नाहीत. परंतू, अपयशावर मात करत सातत्याने अभ्यास केला आणि पल्लवी यांनी 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.

Pallavi Mishra | Sarkarnama

शास्त्रीय गायिका

IAS अधिकारी पल्लवी मिश्रा या शास्त्रीय गायिका आहेत आणि त्यांनी संगीतात 'एमए' केले आहे. लहानपणापासून पं. सिद्धराम कोरवार यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले आहेत.

Pallavi Mishra | Sarkarnama

Next : पत्रकारितेतील करिअर सोडून,भाजपमध्ये प्रवेश करणारी ही महिला कोण ?