Rashmi Mane
वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी आयएएस अधिकारी बनणाऱ्या सृष्टी देशमुख.
सृष्टी मुलींमध्ये पहिल्या आणि संपूर्ण देशात पाचवा क्रमांक (AIR 5) मिळवून यूपीएससी उत्तीर्ण झाल्या होत्या.
सृष्टी देशमुख यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली होती.
सृष्टी देशमुख यांनी अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
तरुणांसाठी त्यांचा यशस्वी प्रवास खूप प्रेरणादायी ठरू शकतो.
सृष्टी यांनी प्रचंड मेहनतीच्या बळावर यश संपादन केले आहे. त्यांना आलेल्या याच अनुभवांवर त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहिले आहे.
‘द आन्सर रायटिंग मॅन्युअल’ हे सृष्टी देशमुख यांनी लिहिलेले पुस्तक विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगाचे आहे.