Rashmi Mane
आयएएस अधिकारी टीना दाबी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
टीना डाबीसोबत तिची बहीण रिया डाबीही चर्चेत आहे. या दोन्ही बहिणी राजस्थान केडरमध्ये तैनात आहेत.
झाले अस आहे की राजस्थान सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट देण्याची घोषणा केली आहे.
या प्रमोशनच्या यादीत आयएएस टीना डाबी आणि आयएएस रिया डाबी या दोघाींची नावे आहेत. एकूण 32 आयएएस अधिकाऱ्यांना बढती मिळणार आहे.
2016 च्या बॅचच्या IAS आणि बारमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांना वरिष्ठ प्रशासकीय वेतनश्रेणीत पदोन्नती दिली जाणार आहे.
त्याचवेळी, 2021 बॅचच्या IAS अधिकारी रिया डाबी यांना देखील कनिष्ठ ते वरिष्ठ प्रशासकीय वेतन मालिकेतील पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.
टीना डाबीने यूपीएससी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला होता, तर तिची बहीण रिया हिने 15 वा क्रमांक मिळविला होता.