Who Is Arjun Ram Meghwal : 'आयएएस' ते केंद्रीय कायदामंत्री; कोण आहेत अर्जुन राम मेघवाल ?

Sunil Balasaheb Dhumal

कायदामंत्री म्हणून वर्णी

केंद्र सरकारमधील किरेन रिजीजू यांना हटवण्यात आले आहे. आता त्यांच्याऐवजी अर्जुनराम मेघवाल यांची नवे कायदामंत्री बनले आहेत.

Arjun Ram Meghwal | Sarkarnama

शिक्षण

अर्जुनराम मेघवाल यांनी 1977 मध्ये बिकानेरच्या डुंगर कॉलेजमधून १९७९ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ते 1982 मध्ये 'आयएएस' बनले.

Arjun Ram Meghwal | Sarkarnama

विविध विभागात अधिकारी

मेघवाल यांनी तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव, विशेष सचिव, उच्च शिक्षण विभाग, व्यवस्थापकीय संचालक, नागपूर निगम लिमिटेड, राजस्थान, अतिरिक्त आयुक्त, वाणिज्य कर विभागाचा पदभारही सांभाळला.

Arjun Ram Meghwal | Sarkarnama

रॉबर्ट वड्रांवर कारवाई

मेघवाल यांनी राजस्थानमधील बिकानेर येथील रॉबर्ट वड्रा यांच्या कथित बेकायदेशीर जमिनीचा व्यवहार उघडकीस आणला.

Arjun Ram Meghwal | Sarkarnama

स्वेच्छा निवृत्ती

राजकारणात येण्यासाठी त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली.

Arjun Ram Meghwal | Sarkarnama

बिकानेरचे खासदार

मेघवाल हे सध्या बिकानेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

Arjun Ram Meghwal | Sarkarnama

विजयाची हॅटट्रिक

मेघवाल यांनी राजकीय कारकिर्दीला 2009 मध्ये सुरुवात केली. त्यांनी भाजपच्या तिकिटावर बिकानेर लोकसभेची पहिली निवडणूक जिंकली. यानंतर 2014 आणि 2019 मध्ये सलग तिसऱ्यांदा खासदार बनले.

Arjun Ram Meghwal | Sarkarnama

'या' मंत्रीपदावर काम

केंद्रीय सांस्कृतिक आणि संसदीय कामकाज मंत्री, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि माजी केंद्रीय जलसंपदा मंत्री, गंगा विकास मंत्री म्हणून मेघवाल यांनी काम पाहिले आहे.

Arjun Ram Meghwal | Sarkarnama

'सायकलिंग'ची आवड

सरकारी कारपेक्षा मेघवाल यांना सायकल चालवायला अधिक आवडते. शपथविधी सोहळ्यालाही ते सायकलवरून राष्ट्रपती भवनात पोहोचले होते.

Arjun Ram Meghwal | Sarkarnama

NEXT : कर्नाटकातल्या एकमेव मराठी महिला आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांचा रंजक राजकीय प्रवास; पाहा फोटो..