Rashmi Mane
कोविड काळातील 'बॉस लेडी' रुबल अग्रवाल यांनी जगभर हैदोस घातलेल्या कोविडच्या काळात पुण्यात अतिरिक्त आयुक्त म्हणून केलेल्या कामगिरीमुळे राज्यभरात त्यांच्या नावाची चर्चा झाली.
रुबल अग्रवाल त्या २००८ बॅचच्या IAS आहेत. 'यूपीएससी' उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले.
अकोला, जळगाव, शिर्डी येथेही त्या कार्यरत होत्या. अग्रवाल यांना साई संस्थानच्या पहिल्या 'सीईओ' होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. तसेच जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
राजस्थानमधील देवळी गावात रुबल अग्रवाल यांचं प्राथमिक शिक्षण झालं.
लहान असतांना 15 ऑगस्टला झेंडा वंदनसाठी जिल्हाधिकारी त्यांच्या गावात आले होते. त्यांना बघितल्यानंतर त्यांच्या मनात जिल्हाधिकाऱ्यांबद्दल उत्सुकता निर्माण झाली. शाळेत असतांना 'यूपीएएसी' परीक्षा नेमकी काय असते, हेही त्यांना त्यावेळी माहित नव्हते.
कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे त्या यूपीएएसीच्या तयारीसाठी दिल्लीला गेल्या.
कोविडच्या काळात त्यांनी पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यासाठी त्यांना प्रशासकीय क्षेत्रात मानाचा समजला जाणारा 'अरुण बोंगिरवार' उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रुबल अग्रवाल या सध्या एकात्मिक बालविकास सेवा विभागाच्या आयुक्त ( ICDS ) म्हणून त्या कार्यरत आहेत.