Amit Ujagare
सर्वात पहिला आणि सर्वोत्तम पर्याय म्हणजे पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन सर्व सेवांची मदत मिळवण्यासाठी ११२ हा क्रमांक डायल करा. या क्रमांकावर २४x७ सेवा कार्यरत आहे इथं फोन केल्यास तुमचं लोकेशनही ऑटोमॅटिक ट्रेस होईल.
जिल्हास्तरीय आपत्ती नियंत्रण कक्ष (DEOC) साठी १०७० किंवा १०७७ हा क्रमांक डायल करा. यामुळं तुम्हाला पूर, भूस्खलन किंवा पूरस्थितीत स्थानिक प्रशासनाकडून तातडीनं मदत मिळते.
कोणीही जखमी झाल्यास किंवा आजारी पडल्यास ताबडतोब १०८ वर कॉल करा. महाराष्ट्रात सरकारी रुग्णवाहिका सेवा या क्रमांकावर उपलब्ध आहे.
मुंबई महानगरपालिका (MCGM) चा विशेष monsoon disaster हेल्पलाइन क्रमांक १९१६ हा असून यावर कॉल केल्यास पूर, घर पडणे, रस्त्यावरील अडथळे यासाठी तातडीने मदत मिळू शकेल.
महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्ष : ०२२-२२०२७९९० किंवा SEOC : +९१-९३२१५८७१४३ या क्रमांकावर फोन करुन तुम्ही मोठ्या आपत्तींसाठी मदत मागू शकता.
घरात पाणी घुसणे, विद्युत शॉर्टसर्किट किंवा इतर आगीच्या घटनांसाठी १०१ या क्रमांकावर संपर्क साधल्यास स्थानिक अग्निशमन दल त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला मदत करेल.
गंभीर परिस्थितीत (उदा. लोक अडकले असतील) ११२ किंवा १०७० वर सांगितल्यास National Disaster Response Force (NDRF) किंवा State Disaster Response Force (SDRF) च्या टीमला पाठवले जाते.
अडचणीत असल्यास तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महापालिका/नगरपालिका आपत्ती नियंत्रण कक्षाशी स्थानिक क्रमांकावर संपर्क साधा. IMDच्या इशाऱ्यानुसार स्थानिक प्रशासन मदत केंद्र उभारत असते.
महत्त्वाचे क्रमांक आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा. शक्यतो सोशल मीडिया @MahaDGIPR, @MumbaiPolice हे ट्विटर हँडल फॉलो करुन ठेवा किंवा जिल्हा प्रशासन पेज फॉलो करा. घाबरू नका, त्वरित ११२ वर कॉल करा, ते समन्वय साधतील.