Jagdish Patil
सुंदर आणि हुशार असलेल्या IFS अधिकारी अपला मिश्रा यांचं लग्न झालं आहे.
नुकतंच अपला मिश्रा यांचा अभिषेक बकोलिया यांच्यासोबत जिम कॉर्बेटमध्ये लग्नसोहळा पार पडला.
अपला मिश्रा यांनी UPSC मध्ये संपूर्ण देशात नववी रँक मिळवली. IAS पोस्टिंग मिळत असतानाही त्यांनी IFS अधिकारी होणं पसंत केलं.
2021 च्या बॅचमधील अपला यांनी 2022 च्या बॅचमधील अभिषेकसोबत लग्नाचे फोटो सोशल मीडियाद्वारे पोस्ट केले आहेत.
यूपीतील गाझियाबाद येथे जन्मलेल्या अपला यांचे वडील आणि भाऊ दोघेही भारतीय सैन्यात आहेत. तर आई दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहे.
अपला मिश्रा यांनी आर्मी कॉलेजमधून दंतचिकित्सा विषयात बॅचलर इन डेंटल सर्जरी (BDS) पदवी मिळवली.
मात्र, सार्वजनिक सेवेची आवडी असल्यामुळे त्यांनी UPSC ची तयारी करण्यासाठी डॉक्टरकी सोडली आणि UPSC क्रॅक केली.
तर पंजाबमधील कोटकपुरा येथील अभिषेक बकोलिया यांनी मार्च 2020 मध्ये UPSC ची तयारी सुरू केली आणि 2021 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश संपादन केलं.