सरकारनामा ब्यूरो
लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांचेच सोशल मीडियावर रिल्स बनवणाचे प्रमाण खूप वाढले आहे. सरकारी अधिकारी, कर्मचारी देखील याला अपवाद नाहीत.
सर्वसामान्यांप्रमाणे सरकारी उच्चपदावरील अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा सोशल मीडियावर धडाकेबाज स्टाईलने रिल्स बनवतात.
रील बनवणाऱ्या अधिकाऱ्यांवर भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी प्रश्न मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना थेट इशार दिला आहे.
महाराष्ट्र शासनाने सेवा शर्ती नियम 1979ला तयार करण्यात आली होती त्यावेळी सोशल मीडिया नव्हता.
सोशल मीडियाचा वापर वाढल्याने आजकाल सरकारी अधिकारी कर्मचारी हे सरकारच्या विरोधातील व्हिडिओ तयार करत आहेत. यासंदर्भात नियम करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर आणि त्यांच्या वर्तवणुकीसंदर्भात नवे नियम लवकरच तयार करण्यात येणार आहेत.
सोशल मीडियाबाबत जम्मू-काश्मीर आणि गुजरात सरकारने चांगले नियम तयार केले आहेत. महाराष्ट्रातही सेवा शर्ती नियम 1979 मध्ये बदल करण्यात येतील, असे फडणवीसांनी सांगितले.
बदलात नवीन माध्यमाचा समावेश केला जाणार असून कर्मचाऱ्यांच्या वर्तणूक संदर्भात नियम असणार आहेत. आणि याबाबत कोणताही बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात सांगितले.