Interview Questions : नोकरीसाठी मुलाखतीला जाताय, मग ‘या’ प्रश्नांची कसून तयारी करा!

Rajanand More

महत्वाचे प्रश्न

मुलाखत म्हटली की कोणते प्रश्न विचारतील, याचा नेम नाही. पण काही प्रश्न प्रत्येक मुलाखतीत हमखास विचारतात. याच प्रश्नांविषयी आणि त्याची उत्तरे कशी द्यावीत, याविषयी जाणून घेऊयात...  

Job Interview | Sarkarnama

तुमच्याविषयी सांगा...

साधारणपणे हा पहिला प्रश्न असतो. यामध्ये तुम्ही तुमचा अनुभव, कामाची पार्श्वभूमी, तुमच्या अचिव्हमेंट्स सांगू शकता. नोकरीसाठी महत्वाच्या बाबींवरच तुमचा फोकस हवा. 

Job Interview | Sarkarnama

तुमच्यातील उणिवा कोणत्या?

हा प्रश्न तुम्हाला अडचणीत आणणारा ठरू शकतो. उत्तर देताना तुमची संधी जाणार नाही, याचे भान ठेवा. उणिवा सांगताना त्यात सुधारण्यासाठी तुम्ही कशी मेहनत घेत आहात, हे सांगायला विसरू नका.

Job Interview | Sarkarnama

तुमची निवड का करावी?

या नोकरीसाठी किंवा पदासाठी तुम्हीच कसे योग्य आहात, हे पटवून देण्याची ही संधी असते. त्यामुळे तुमच्यातील कौशल्य आणि अनुभव या पदासाठी कसा उपयोगी आहे, त्याचा कसा फायदा होईल, हे ठामपणे सांगा.

Job Interview | Sarkarnama

पाच वर्षांत तुम्ही स्वत:ला कुठे पाहता?

तुमच्या महत्वाकांक्षा काय आहेत, हे यातून समजते. स्वतं:सह संबंधित कंपनी किंवा संस्थेची भरभराट कशी होईल, याला प्राधान्य हवे. तुमची शिकण्याची आणि कामांत सुधारणा करण्याची वृत्ती यातून दिसायला हवी.

Job Interview | Sarkarnama

सध्याची नोकरी का सोडत आहात?

या प्रश्नाचे उत्तर देताना तुमचा प्रामाणिकपणा आणि तेवढाच तुमचा कंपनीविषयीचा दृष्टीकोनही दिसून येईल. आधीच्या नोकरीविषयी नकारात्मक बोलणे टाळा. करिअरमध्ये पुढे जाण्याची चांगली संधी, नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी आदी मुद्यांवर फोकस हवा.

Job Interview | Sarkarnama

अपयशाबाबत सांगा

या प्रश्नाचे उत्तर देताना प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या अपयशातून तुम्हाला करिअरच्यादृष्टीने खूप शिकायला मिळाले आणि झालेल्या चुका सुधारण्यासाठी काय प्रयत्न केले, हे सांगताना अशा चुका पुन्हा होणार नाहीत, याची खात्री पटवून देण्याचा प्रयत्न करा.

Job Interview | Sarkarnama

पगाराची अपेक्षा

मुलाखतीआधीच संबंधित पदासाठी किमान आणि कमाल किती पगार मिळू शकतो, याची माहिती घ्या. तुमचा अनुभवाच्या आधारे पगार सांगा. किंवा कामाचे स्वरूप, मिळणारे फायदे पाहून पगाराबाबत चर्चा करू शकता.

Job Interview | Sarkarnama

NEXT : सोशल मीडियावर हिट असलेल्या अभिश्री अन् अक्षय लाब्रू यांची अशी आहे लव्ह स्टोरी

येथे क्लिक करा.