Roshan More
मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही, असे भुजबळांनी ठणकावून सांगितले.
बीडच्या सभेत जेसीबी आणि हेलिकॉप्टरमधून फुलांची उधळण केली. तरीही ते गरीब आहेत, असा टोला भुजबळांनी लगावला.
शिवाजी महाराजांच्या सेनेला मराठा सेना नव्हे मावळ्यांची सेना म्हटलं गेलं, असं छगन भुजबळांनी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली. सार्वजनिक शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली, असे भुजबळ म्हणाले.
मराठा समाजाचे नाव न घेता लढाई ब्राह्मणांविरोधात नव्हती, तर ब्राह्मण्याविरोधात होती. आज अन्याय करणारे बदलले आहेत, असे भुजबळांनी म्हटले.
मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही सुरू आहे, त्याला आमचा विरोध आहे.
आता मुंबईला यांची गरीब लेकरंबाळं 200 वाहने घेऊन गेले. उपोषणासाठी मैदान बघण्याकरिता. ते गरीब मग बाकीचे श्रीमंत आहेत का?