Independent MP : अठराव्या लोकसभेतील अपक्ष खासदार....

Vijaykumar Dudhale

अपक्ष खासदार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभरातून सात खासदार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.

Independent MP | Sarkarnama

विशाल पाटील

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव केला. ही जागा महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटली होती.

Vishal Patil | Sarkarnama

उमेशभाई बाबूभाई पटेल

उमेशभाई बाबूभाई पटेल यांन दमण आणि दीव मतदारसंघातून सुमारे 6,225 मतांच्या फरकाने भाजपचे खासदार लालूभाई बाबूभाई पटेल यांचा पराभव केला. भाजपचे खासदार लालूभाई बाबूभाई पटेल हे या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते.

Umeshbhai Babubhai Patel | Sarkarnama

मोहम्मद हनीफा

मोहम्मद हनीफा यांनी लडाखमधून काँग्रेसचे उमेदवार त्सेरिंग नामग्याल यांचा 27 हजार 862 मतांनी पराभव केला आहे.

Mohammad Hanifa | Sarkarnama

राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव

राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांनी बिहारमधील पूर्णिया मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. पप्पू यादव यांनी संयुक्त जनता दलाचे संतोषकुमार कुशावह यांचा 23 हजार 847मतांनी पराभव केला.

Papu Yadav | Sarkarnama

शेख अब्दुल रशीद

जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघातून शेख अब्दुल रशीद हा अभियंता अपक्ष निवडून आला आहे. त्याने जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा दोन लाख चार हजार 142 मतांनी पराभव केला आहे. तो सध्या दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे.

Sheikh Abdul Rasheed | Sarkarnama

अमृतपाल सिंग

अमृतपाल सिंग याने पंजाबमधील खदूर साहिब मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कुलबुयर सिंग झिरा यांच्याविरोधात सुमारे 1 लाख 97 हजार 120 मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. अमृतपाल हा ‘वारीस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख असून तो राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत सध्या आसामच्या दिब्रुगड तुरुंगात आहे.

Amritpal Singh | Sarkarnama

सरबजित सिंग खालसा

सरबजीत सिंग खालसा हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणारा अंगरक्षक बेअंत सिंग याचा मुलगा आहे. सरबजीत सिंग यांनी फरीदकोटमधून आम आदमी पक्षाचे करमजीत सिंग अनमोल यांचा सुमारे 70,053 मतांनी पराभव केला.

Sarabjit Singh Khalsa | Sarkarnama

UPSC परीक्षा क्रॅक करण्यासाठी जाणून घ्या; सृष्टी देशमुख यांच्या खास टिप्स!

IAS Srushti Deshmukh | Sarkarnama