Sachin Fulpagare
विरोधी पक्षांच्या बैठकीत आज मोठा निर्णय झाला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून सर्व घटक पक्षांनी सहमती दर्शवली.
बैठकीत राहुल गांधींनी मोठी माहिती दिली. नितीशकुमार यांना समन्वयक बनवण्यात ममता बॅनर्जींचा नकार होता, हे गुपित त्यांनी उघड केले.
आघाडीच्या निर्णयानंतर अखेर नितीश कुमार यांनी अखेर माघार घेतली. तर नितीशकुमार यांना समन्वयक बनवायला हवे होते, असे डाव्या पक्षांनी म्हटले.
लवकरात लवकर जागावाटप करावे. तसेच खर्गेंनी आघाडीचे नेतृत्व करावे, यावर सर्वांची सहमती झाल्याचे पवारांनी सांगितले.
आगामी रणनीती बनवण्यावर एकमत झाले. तसेच नितीशकुमार यांनी समन्वयकपदाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन केल्याचे पवारांनी सांगितले.
आघाडीत जागावाटपाची चर्चा सकारात्मक दिशेने पुढे सुरू आहे. सर्व पक्षांनी राहुल गांधींसोबत 'भारत जोडो न्याय यात्रेत' सहभागी व्हावे, असे आवाहन खर्गेंनी केले.
बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे नेते अखिलेश यादव हे अनुपस्थित होते.