Pradeep Pendhare
भारतीय क्रिकेटचा धडाकेबाज फलंदाज सरफराज खानला भारत (अ) आणि दक्षिण आफ्रिका (अ) संघांमधील सामन्यांमध्ये स्थान मिळाले नाही, यावरून राजकारण तापलं आहे.
भारत (अ) संघाच्या अलीकडच्या इंग्लंड दौऱ्यात सरफराज खानची कामगिरीने चांगली राहिली होती. तरी देखील त्याला वगळल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काँग्रेस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या 'AIMIM'ने 'BCCI'वर गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरवर मोठा आरोप करताना, "सरफराजची निवड त्याच्या आडनावामुळे झाली नाही का?" असा प्रश्न केला.
काँग्रेस नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांनी केलेले आरोप फेटाळून लावताना, माजी भारतीय वेगवान गोलंदाज अतुल वासन यांनी त्यांचा प्रश्न हास्यास्पद असल्याचे म्हटले.
अतुल वासन म्हणाले, 'धर्माचे कार्ड खेळणे योग्य नाही. सरफराज खानला त्याच्या पात्रतेच्या संधी दिल्या नाहीत. परंतु काँग्रेसचे आरोप निरर्थक आहेत.'
'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही 'BCCI'च्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सरफराज खानची इंडिया (अ) संघातही निवड का झाली नाही? असा प्रश्न असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.