Pradeep Pendhare
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं.
भारताने 'एअर स्ट्राइक'मध्ये पाकिस्तानस्थित नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली.
गेल्या तीन-चार दिवसांत भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्यस्थितीत पाकिस्तानने ड्रोन हल्ले, गोळीबार, तोफगोळ्यांचा हल्ला सुरू केला.
अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तानमध्ये शनिवारी सायंकाळी शस्त्रसंधी झाली.
पाकिस्तानने अवघ्या तीन तासांत शस्त्रसंधीवर उल्लंघन करत ड्रोन हल्ला चढवला.
शस्त्रसंधीवर भारत-पाकिस्तानमध्ये उद्या 12 मे रोजी पुन्हा चर्चा होणार आहे.
शस्त्रसंधीत दोन्ही देशांमध्ये होणारे करार मान्य असले पाहिजे. याशिवाय तिसऱ्या देशाची मध्यस्थी महत्त्वाची ठरते.
भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीत नेमक्या कोणत्या अटी-शर्ती ठरल्यात, याची माहिती अजून तरी समोर आलेली नाही.
युद्धबंदी तोडल्यास त्यावर संयुक्त राष्ट्र (UN) संघात आवाज उठवता येऊ शकतो.